JSPM's Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi

JSPM's Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi Admissions Open......! Polytechnic (Diploma Engineering) at JSPM Wagholi, Pune. JSPM's Bhivrabai

25/04/2026
जे.एस.पी.एम च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक वाघोली, पुणे. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशस्व...
31/03/2026

जे.एस.पी.एम च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक वाघोली, पुणे. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशस्वी निवड:

जेएसपीएम संचलित भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयातील तुषार बापू यनबर, आदित्य धनराज सूर्यवंशी, अभिषेक प्रकाश लोहार आणि सोहम शैलेश भोसुरे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी (Capgemini) या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे यशस्वी निवड झाली असून त्यांना 3.25 लाख वार्षिक पॅकेज प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जेएसपीएम वाघोली संकुलाचे संकुल संचालक डॉ.वसंत बुगडे, सहाय्यक संकुल संचालक प्रा.एस.के.वाकचौरे, प्राचार्य डॉ.पी.टी.काळे, उपप्राचार्य डॉ.एम.एस.यादव, डीन व्ही.एस.दाभाडे,सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.प्रा. तानाजीराव सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत, विश्वस्त ऋषिराज सावंत यांनीही विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

06/03/2026

*पोस्टर प्रेझेंटेशन – मेकॅनिकल विभागात उत्साहात आयोजन*
पुणे : JSPM'S भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली, पुणे येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक विषयांवर माहितीपूर्ण पोस्टर सादर करून आपले ज्ञान, सर्जनशीलता आणि संशोधन कौशल्य प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्समधून आधुनिक तंत्रज्ञान, AI चा वापर, ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण तसेच विविध अभियांत्रिकी संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज मिळण्याबरोबरच सादरीकरण कौशल्य विकसित करण्यास मदत झाली.
दि. 06 मार्च 2026 रोजी आयोजित या उपक्रमामध्ये एकूण 19 गटांनी सहभाग घेतला असून सुमारे 70 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. वसंत बुगडे, असिस्टंट कॅम्पस डायरेक्टर प्रा. एस. के. वाकचौरे, प्राचार्य डॉ. प्रदीप काळे, डीन डॉ. वैशाली दाभाडे तसेच विभाग प्रमुख डॉ. महेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 👏📚

JSPM'S Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi,Pune मेकॅनिकल विभागामधील 24 विद्यार्थ्यांचे Force Motor India Pvt Lmt या कं...
05/03/2026

JSPM'S Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi,Pune मेकॅनिकल विभागामधील 24 विद्यार्थ्यांचे Force Motor India Pvt Lmt या कंपनीमध्ये तसेच 10 विद्यार्थ्यांचे Chromwwell Engineering या कंपनी मध्ये निवड झाल्याकारणाने मुलांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.
या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर डॉ. वसंत बुगडे, असिस्टंट कॅम्पस डायरेक्टर प्रा. एस के वाकचौरे, प्राचार्य डॉ. प्रदीप काळे, डीन डॉ. वैशाली दाभाडे तसेच विभाग प्रमुख डॉ.महेश यादव ,सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

05/03/2026

Falicitation of Third Year Mechanical department students (With parents) of Bhivrabai Sawant Polytechnic Wagholi for getting 3rd prize in Prestigeous state level project competition Dipnova-2026 organised by JSPM University, Pune.

03/03/2026

पुणे : JSPM University Pune येथे आयोजित DIPNova-2026 स्पर्धेत *भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली* विद्यार्थ्यांचे *४ पारितोषिकांसह* घवघवीत यश

पुणे – JSPM University Pune येथे आयोजित ‘DIPNova-2026’ या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये *भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, वाघोली* येथील विद्यार्थ्यांनी *४ पारितोषिके* मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

*इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रथमेश पाटील, उत्कर्ष गावडे, ओम तानपुरे आणि वैभव दांडगे* यांनी ‘Smart City, IoT, Robotics & Automation’ या डोमेनमध्ये ‘Hand Gesture Control EV Car’ प्रकल्पामध्ये *२५००० रु.* रकम व सन्मानचनासह *द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक* मिळवले. त्यांना *प्रा. निकिता पाटील* यांनी मार्गदर्शन केले.
*मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या तुषार बापू यनभर, सोहम शैलेश भोसुरे, रोहित नितीन कोळी आणि अमन इक्बाल दारुवाले* या विद्यार्थ्यांनी ‘Waste Material Heat Recovery Plant’ उपयुक्त प्रकल्पासाठी *१५००० रु. रकमेसह तृतीय क्रमांक* पटकावला. त्यांना *प्रा. सतीश कुमार माळी* यांनी मार्गदर्शन केले.

याच स्पर्धेमध्ये *तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी* विभागातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन करत विविध डोमेनमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. ‘AI and Cybersecurity’ या डोमेनमध्ये *अर्पिता बिरादार, सावनी तुडमे आणि रोहित शिंदे* यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत *१०००० रु. रकमेसह चतुर्थ क्रमांक* मिळवला. त्यांना *प्रा. सायली आंबेकर यांनी मार्गदर्शन केले*. तसेच ‘Agricultural’ या डोमेनमध्ये *प्रज्ञा भारत माने, मंजिरी चंद्रकांत हुसे, अद्न्या भारत माने आणि गायत्री रणबा खंडारे* यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून *१०००० रु. रकमेसह चतुर्थ क्रमांक* प्राप्त केला. त्यांना *प्रा. नेहा सराफ यांनी मार्गदर्शन केले.*

‘Viksit Bharat 2047’ या संकल्पनेवर आधारित या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात भिवराबाई सावंत पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर डॉ. वसंत बुगडे, असिस्टंट कॅम्पस डायरेक्टर प्रा. एस के वाकचौरे, प्राचार्य डॉ. प्रदीप काळे, डीन डॉ. वैशाली दाभाडे तसेच विभाग प्रमुख प्रा. सोनाली गायकवाड, प्रा. संदीप पोखरकर, डॉ. महेश यादव प्रा. नामदेव भुतेकर, प्रा.मोनिका काश्मीर आणि प्रा. दत्तात्रय शिंदे , सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

01/03/2026

Address

Pune
412207

Alerts

Be the first to know and let us send you an email when JSPM's Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JSPM's Bhivrabai Sawant Polytechnic, Wagholi:

Share