09/09/2026
अभिमानाचा क्षण! 💐
आमचे माजी विद्यार्थी सिद्धेश्वर जाधव यांना “राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
माजी विद्यार्थी म्हणून आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्याचा हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
परभणी फाउंडेशनचे समन्वयक, उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सिद्धेश्वर जाधव सर यांना दीपस्तंभ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यामध्ये सरांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या सहकार्याने मागील वर्षी परभणी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा हा तांत्रिकदृष्ट्या अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
तसेच “एक विद्यार्थी, एक झाड” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जनजागृती निर्माण करून त्यांच्यात पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आवश्यक गुणांचा विकास घडवून आणण्याचे कार्य करण्यात आले.
अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शिक्षण अधिक परिणामकारक व समाजाभिमुख करण्यासाठी सर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची राज्यस्तरीय पुरस्काराने झालेली दखल ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
सिद्धेश्वर जाधव सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Parbhani foundation-परभणी फाउंडेशन
Sidheshwar Shakuntala Laxmanrao Jadhav