शेतकऱ्यांना उत्तमोत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने कंपनीची सुरुवात करण्यात आली होती आणि ती अनोख्या ऑफरसाठी ओळखली जाते. महालक्ष्मी फर्टिलायझर्सने केवळ खते विकून नफा मिळवणे हे उद्दिष्ट कधीच ठेवले नाही. कंपनी मार्फत शेतकऱ्यांना खतांचा वापर कसा करावा, पिकपद्धती, नैसर्गिक शेती याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांना नव्या तंत्राशी जोडून जागतिक बाजारपेठेशी संपर्क कसा राहील यावर भर दिला जातो.
या व
्यतिरिक्त श्री. सुरेश साळुंखे यांनी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजकतेची संधी दिली. कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनाच त्यांनी कंपनीत संचालक म्हणून घेतले. त्यामुळे "शेतकऱ्यांना मालक बनवणारी कंपनी" अशी महालक्ष्मी फर्टिलायझर्सची वेगळी ओळख निर्माण झाली.
श्री. सुरेश साळुंखे यांनी कृषी विपणनात एमबीए केले आणि 1992 पासून ते कृषी क्षेत्राचा एक भाग आहेत. दोन दशके समर्पितपणे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे ध्येय स्पष्ट होते-शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची उत्पादने आणि त्यांचे जीवन चांगले करण्याची संधी मिळाली पाहिजे.
आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंब्याने, त्यांच्या स्वप्नात असलेल्या महालक्ष्मी फर्टिलायझर्सचे त्यांनी वास्तवात रूपांतर केले. श्री. सुरेश साळुंखे सर कंपनीमध्ये मोठे गुंतवणूकदार किंवा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना सामील करून घेऊ शकत असतानादेखील, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसोबत भागीदारी करणे निवडले. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि आज महालक्ष्मी फर्टिलायझर्स कोल्हापूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
महालक्ष्मी फर्टिलायझर्सने भूमाई हा खतांचा ब्रॅण्ड बाजारात आणला. त्याअंतर्गत भूमाई एनपीके, भूमाई नीम, भूमाई मॅग्नेशियम, भूमाई मायक्रो नुट्रीएंट, भूमाई ऑर्गेमिन आणि भूमाई ९८% ह्युमिक एसिड इत्यादी खते आणि इतर कृषी उत्पादने तयार करते. "विश्वास जपणारी आपली माणसं" हे कंपनीचे ब्रीदच महालक्ष्मी फर्टिलायझर्सच्या यशाचे गमक आहे.
कंपनीचे शेतकरी संचालक मंडळ :
१. सचिन पाटील, कोवाड, कोल्हापूर
२. रमेशचंद्र भुतडा, बीड
३. अरुण नाईक, कोल्हापूर
४. अविनाश घोमण, पुणे